शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका ‘अर्थ’संकल्पाच्या चर्चेत ‘निरर्थक’ गाणी आणि शेरोशायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:45 IST

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकमेकांना चिमटेही...

ठळक मुद्देअंदाजपत्रक मुख्य सभा : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रंगली काव्यात्मक चर्चा

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सोमवारपासून मुख्य सभेमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकमेकांना चिमटेही काढले जात होते. परंतु, अर्थसंकल्पाच्या चर्चेत आर्थिक मुद्यांवर चर्चा होण्याऐवजी निरर्थक संघगीते आणि शेरोशायरीने सभागृहाचा वेळ घेतला.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी अंदाजपत्रकातील मनोगताचा शेवट ‘संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो, भला हो जिसमे देश का, वो काम सब किये चलो’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पद्याने केला आहे. मुख्य सभेत चर्चेदरम्यान, नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या शिवसेनेला उद्देशून  ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला ही रहेगा’ हे चित्रपटातील गीत ऐकवले. शिवसेनेच्या बाळासाहेब ओसवाल यांनी एका भारुडाचे विडंबन करीत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके यांनीही संघाच्या पद्याच्या ओळी म्हटल्या.   बुधवारच्या चर्चेदरम्यान गटनेत्यांची भाषणे झाली. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनीही चिंतल यांना हिंदी चित्रपटगीताच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोस्तो से प्यार किया, दुश्मनोंसे बदला लिया, जो भी किया, हमने शान से किया।’ विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी, ‘बारीश की तरह मेहेरबानी आप किजीये, आप अपनो की और तुपनो की सियासत बंद किजीये’ असे सांगितले.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरीचा आधार घेतला. महाविकास आघाडीवरील टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले ‘मुझे छोडकर अगर वो खुश है, तो शिकायत कैसी, अगर खुश भी ना देख पाऊँ, तो वो ‘युती’ कैसी? प्रशासन नगरसेवकांच्या कामांवर  ‘बारीक’ लक्ष ठेवत असल्यावरून ‘इथे प्रत्येकाला माहितीय प्रत्येकाचं गुपित, इथे प्रत्येक जण डागाळलेला, इथं चंद्रसुद्धा शापित’ ही चंद्रशेखर गोखलेंची चारोळीही त्यांनी ऐकवली- सुनावली. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील ‘संबंधां’वरही शिंदे यांनी गोखले यांची ‘नदीकाठचं गवत नदीशी सलगीनं वागायचं, कारण त्याला जगायला नदीचं पाणी लागायचं’ ही चारोळी ऐकविली. सभागृह नेते धीरज घाटे यांनी शिवसेनेला उद्देशून  ‘हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात साथ छोड देंगे, हम दोस्ती करते है, पानी और मछली की तरह, जुदा करना चाहो तो दम तोड देंगे’ हा शेर म्हटला. भाषण संपविताना  ‘देश हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’ हे संघगीत म्हणत देशभक्तीवरून चिमटा काढला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस