शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वर्गीकरणाची शिस्त अंगलट

By admin | Updated: January 12, 2015 02:31 IST

शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी

पुणे : शहरातील कचरा शहरातच जिरवावा तसेच कचरा निर्माण होण्याच्या जागीच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना शिस्त लागावी, म्हणून महापालिकेकडून सोसायट्यांंमधून मिश्र कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. मात्र, ही शिस्त आता महापालिकेच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका कचरा घेत नसल्याने नागरिकांकडून शेकडो टन कचरा रात्रीच्या वेळी जागा मिळेल तिथे टाकण्यात येत आहे. हा कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी ढीग साचले असून, दुर्गंधी पसरली आहे.शहरात दररोज सुमारे १५०० ते १६०० टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा पालिकेच्या काही मोजक्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर तसेच उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. हा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ जानेवारीपासून कचरा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर आठ दिवसांनंतर ८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला़ शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेस नवीन प्रकल्प उभारता यावेत, त्यासाठी महापालिकेस उरुळी देवाची येथील डेपोमध्ये पुढील ९ महिने कचरा कॅपिंगमध्ये घेण्याची मुदतवाढ उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र, ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यानंतरच शहरातील कचरा शहरात जिरविण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या होत्या. त्याअंतर्गत ज्या सोसायट्यांकडे कचरा प्रकल्प आहेत, त्यांचा ओला कचरा न घेणे, वर्गीकरण असल्याशिवाय घंटागाडीत कचरा न घेणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम होत असल्याचे दिसते.