शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सीएमईमुळे बोपखेलच्या रहिवाशांची गैरसोय कायम

By admin | Updated: May 18, 2015 05:40 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्याने दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) आपल्या हद्दीतील दापोडी-बोपखेल हा

पिंपरी : उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्याने दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) आपल्या हद्दीतील दापोडी-बोपखेल हा वाहतुकीचा रस्ता बुधवारी (दि. १३) बंद केला. या संदर्भात अद्यापही तोडगा न निघाल्याने तेथील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. भोसरी, विश्रांतवाडीमार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. दैनंदिन व्यवहारासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेत समाविष्ट असलेले बोपखेल गाव १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. बोपखेल, रामनगर आणि गणेशनगर भागात सुमारे २० हजार लोक राहतात. यामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ, तसेच लष्करी आणि निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे. दापोडी, बोपोडी, खडकी, फुगेवाडी, कासारवाडी, तसेच पुणे शहरात जाण्यासाठी सीएमईतील रस्ता अधिक सोईस्कर आहे. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांत येथील विद्यार्थी जातात. तसेच, कामासाठीही हा भाग अधिक संबंधित आहे. बोपखेल-दापोडीतून खडकीत येण्यासाठी ५ किलोमीटर अंतर पडते. मात्र, प्रवेशद्वार बंद असल्याने ग्रामस्थांना भोसरी किंवा विश्रांतवाडीमार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. ५ किलोमीटर अंतरासाठी १५ ते २० किलोमीटर अंतर कापावे लागत आहे. त्यामुळे रिक्षासाठी १५ ऐवजी ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासाचाखर्च वाढून वेळही खर्ची पडत आहे. पुणे मनपा-विश्रांतवाडी-बोपखेल, पिंपरी-भोसरी-बोपखेल या मार्गावर पीएमपी बससेवा आहे. मात्र, ती अनियमित असल्याने संबंधितांची गैरसोय होत आहे. त्यांना बसवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोजच्या त्रासामुळे बोपखेलवासीय वैतागले आहेत. दुसरीकडे सीएमईतील लष्करी जवानांना ये-जा करण्यासाठी गणेशनगर येथून मार्ग खुला केला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा व महाविद्यालये सुरू होत आहेत. (प्रतिनिधी)