शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी सांगलीहून बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 3:07 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घालणार होते साकडे..

बारामती (सांगवी) : विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी माघारी पाठविली. बारामती तालुक्यात कोरोनामुळे जनता कर्फ्यु सुरु आहे. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी साकडे घालण्यासाठी सांगलीहुन निघाली आहे. सोमवारी(दि ७) सकाळी १० च्या सुमारास ही दिंडी सांगवी(ता.बारामती) येथे पायी पोहचली होती. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी पायी आलेल्या दिंडीला माघारी पाठवले.

शासनाच्या प्रचलित नियमानुसार विनाअनुदानित शाळांना देय असलेले वेतनाचे आदेश ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत काढावेत . शरद पवारअजित पवार यांना अनुदानाचे साकडे घालण्यासाठी  पायी दिंडी काढण्यात होती. मात्र, बारामती तालुक्यात सात दिवस जनता कर्फ्यू असल्याने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी शिक्षकांची पायी आलेली दिंडी रोखली. शरद पवार व अजित पवार यांची खासगी घरे असल्याने आपल्याला आंदोलन करता येणार नसल्याचे सांगत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्याची विनंती करण्यात आली. त्यांची समजूत काढत घोलप यांनी निवेदन स्वीकारत दिंडी माघारी पाठवण्यात आली. मात्र, जनता कर्फ्यू संपल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. संघटनेला शिक्षणमंत्री यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते.  दि.२२ जून रोजी  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत झालेल्या संयुक्त बैठकीत विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले होते. यात १ एप्रिल २०१९ पासून प्रचलित नियमानुसार घोषित शाळांना २० टक्के व पूर्वी २० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीही देखील आज अखेर वेतन अनुदानाचे आदेश काढले नाहीत. तसेच अघोषित शाळा या निधीसह घोषित कराव्यात. २०% मध्येच पटाअभावी अतिरिक्त होत असलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे. संघटना  गेली १५ ते २० वर्षे बिनपगारी, प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून शासनाने  केवळ आश्वासनेच दिली आहेत.  कोरोनामुळे जरी आर्थिक ओढाताण असली तरी आम्ही गेली २० वर्षे पगार न घेता काम करीत आहोत, शिक्षकांच्याच बाबतीत हा अन्याय का?असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. आमचा हा प्रश्न फक्त राज्याचे शरद पवार च सोडवू शकतात. असे  संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार