शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

ग्रंथालयांना ‘डिजिटायझेशन’चा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 02:10 IST

पुणे नगर वाचन मंदिर : जानेवारीपासून कामाला सुरुवात होणार

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते हा दस्तावेज जतन केला जावा, ग्रंथांचा अमूल्य ठेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपला जावा, यादृष्टीने डिजिटायझेशन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. काळाची पावले ओळखत पुणे नगर वाचन मंदिराने दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला असून, जानेवारीपासून मुख्य प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यभरातील व्यक्ती, संस्था, ग्रंथालयांकडे उपलब्ध असलेली दुर्मिळ पुस्तकेही वाचन मंदिराकडून कोणतेही शुल्क न आकारता डिजिटाईझ करून दिली जाणार आहेत.

दुर्मिळ पुस्तके अथवा प्रती काळाच्या ओघात सहज उपलब्ध होणे अवघड होऊन बसते. पुस्तकांचे स्कॅनिंग, तसेच डिजिटायझेशन केल्यास हा ठेवा कायमस्वरुपी संगणकीकृत करून जतन केला जाऊ शकतो. यासाठीच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पुणे नगर वाचन मंदिराने डिजिटायझेशनचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षभरात सात ते आठ लाख रुपये खर्च करून सुमारे तीन ते चार लाख पानांचे डिजिटायझेशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेने विशेष डिजिटायझेशन समिती नेमली असून, प्रसाद जोशी या समितीचे प्रमुख आहेत, अशी माहिती कार्यवाह अरविंद रानडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.संस्थेतील पुस्तकांबरोबरच राज्यभरातील ग्रंथालये, संस्था यांनाही त्यांच्याकडील दुर्मिळ पुस्तके, नकाशे, फोटो, पोथ्या, हस्तलिखिते पुणे नगर वाचन मंदिराकडे सोपविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तकांची स्थिती, पानांचा दर्जा आदींची तपासणी करून नि:शुल्क डिजिटायझेशन करून दिले जाणार आहे. यासाठी संस्थेतर्फे राज्यभरातील ग्रंथालयांना पत्रेही पाठवण्यात आली आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी, चिपळूण, भोर, वाई आदी भागांतील ग्रंथालयांनी पुणे नगर वाचन मंदिराशी संपर्क साधला आहे. या भागांतील ग्रंथालयांमध्ये संस्थेचे प्रतिनिधी स्वत: जाऊन पुस्तकांची पाहणी, तपासणी करणार आहेत. एसपी महाविद्यालयात सुमारे पाच-सहा हजार दुर्मिळ पुस्तके उपलब्ध असून, महाविद्यालयाने संस्थेशी संपर्क साधला आहे.पुस्तकांची तपासणी होणारडिजिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये पुस्तकांची तपासणी, पानांचे स्कॅनिंग, इंडेक्स तयार करणे, पिवळी अथवा जीर्ण झालेली पाने शक्य तितकी पांढरी आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे, सीडी स्वरुपात जतन आदी टप्प्यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात संस्थेकडे उपलब्ध असलेली कोल्हापूर, बेळगाव गॅझेट, सूपशास्त्र, मल्लविद्येचे चार खंड, व्यायामकोशाचे १० खंड आदींचा समावेश आहे.या प्रक्रियेमध्ये सरसकट डिजिटायझेशन न करता सुरुवातीला कोणती पुस्तके अद्याप डिजिटाईझ झालेली नाहीत याचा शोध घेणे, पुस्तकांचे वर्गीकरण, स्कॅनिंग आदी टप्प्यांवर काम केले जाणार आहे.पुणे नगर वाचन मंदिरातर्फे जानेवारी महिन्यापासून डिजिटायझेशनला सुरुवात केली जाणार आहे. वर्षभरात सुमारे तीन ते चार लाख पानांचे डिजिटायझेशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतील पुस्तकांबरोबरच राज्यभरातील ग्रंथालये, संस्था आणि व्यक्ती यांच्याकडील दुर्मिळ पुस्तके, पोथ्या, नकाशे, हस्तलिखिते, फोटो संस्थेकडे सोपविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाचन मंदिराकडून डिजिटायझेशन नि:शुल्क करून दिले जाणार आहे.- अरविंद रानडे, कार्यवाह 

टॅग्स :Puneपुणेdigitalडिजिटलlibraryवाचनालय