शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच डिजिटल कामाचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:58 IST

उस्मानाबाद जिल्ह्याने ९२.७९ टक्के सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीचा देत, राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.  

ठळक मुद्देडिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा : १५ जिल्ह्यांत कामाचा टक्का दहाच्या आत नागपूरमध्ये झाले अवघ्ये ५ टक्के काम

पुणे : शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या नागपुर जिल्ह्यातच अवघे ५.०८ टक्के सातबारा-डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगरमध्ये शून्य टक्के काम झाले असून, १५ जिल्ह्यांनी सातबारा संख्येच्या दहा टक्के देखील काम केलेले नाही. उस्मानाबाद जिल्ह्याने ९२.७९ टक्के सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीचा देत, राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.  शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळविणे सोयीचे जावे यासाठी राज्य सरकारने १ मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्व्हरवर ताण आल्याने ही सेवा कोलमडली. काही जिल्ह्यात तर १८ जुलै पर्यंत काम ठप्प पडले होते. राज्यातील अडीच कोटी सात-बारा उतारा आॅनलाईन झाले आहेत. तांत्रिक अडचणी उद्भविल्याने आॅनलाईन प्रिंट घेऊन, सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. राज्यात १९ जुलै पर्यंत सातबारा उताऱ्याच्या सर्व्हरमधील अडचणी दूर करण्यात आल्याचे ई फेरफार प्रकल्पाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्यात ४३ हजार ९४६ गावांमध्ये २ कोटी ४९ लाख ५९ हजार ९५ सर्व्हे क्रमांक आहेत. त्यातील ४१ लाख ७५ हजार सातबारा उतारे १७ जुलै पर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले होते. तसेच, २९ जुलै पर्यंत त्यात ४२ लाखांपर्यंत वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. राज्यसरकारने डिजिटल स्वाक्षरीच्या सातबाराची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. मात्र, त्यात मुख्यमंत्र्यांचा नागपुर जिल्हाबराच मागे आहे. या जिल्ह्यातील १ हजार ९५६ गावांमधील ७ लाख ७३ हजार ८८२ सर्व्हे क्रमांकापैकी अवघ्या ३८ हजार ८३३ सर्व्हे क्रमांकावरच डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ७१८ गावे असून, २ लाख ९० हजार ७८ सर्व्हे क्रमांक आहेत. त्यातील तब्बल २ लाख ६९ हजार १७६ सातबारा उतारे (९२.७९ टक्के) डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. ------------------------मोठे जिल्हे डिजिटल कामात मागेराज्यातील सुमारे अडीच कोटी सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल ४४ लाख सातबारा उतारे सिंधुदूर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात १६ लाख ३२ हजार सातबारा उतारे असून, येथे १७ जुलै पर्यंत शून्य टक्के काम झाले होते. पुणे अणि साताऱ्यात अनुक्रमे साडेसात आणि २.८७ टक्के काम झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरonlineऑनलाइनFarmerशेतकरी