शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

‘पीएमपी’ची डिजिटलकडे वाटचाल; सर्व कार्यालये होणार ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 8:27 PM

प्रत्येक बसची देखभाल-दुरूस्ती, कर्मचाऱ्यांची माहिती मुख्य कार्यालयात एका क्लिकवर कळणार

ठळक मुद्दे'पीएमपी'ची सर्व आगार कार्यालये, वर्कशॉप, भांडार एकमेकांशी जोडली जाणार विविध मार्गाने सुरू असलेली अनियमितता दुर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त

पुणे : बहुतेक कामे कागदावरच सुरू असलेले पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) लवकरच 'पेपरलेस' म्हणजे 'डिजिटल' होणार आहे. 'पीएमपी'ची सर्व आगार कार्यालये, वर्कशॉप, भांडार एकमेकांशी जोडली जाणार आहेत. आगारांमध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक सुट्टे भाग, प्रत्येक बसची देखभाल-दुरूस्ती, कर्मचाऱ्यांची माहिती मुख्य कार्यालयात एका क्लिकवर कळणार आहे. त्यामुळे विविध मार्गाने सुरू असलेली अनियमितता दुर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सध्याच्या डिजिटल युगात पीएमपीचा कारभार कागदोपत्रीच होत आहे. आगरांमधून अधिकृत कागद आल्याशिवाय पुढील कामे होत नाहीत. कोणत्या आगाराची सद्यस्थिती काय आहे, याची दैनंदिन माहिती स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाला कळत नाही. आगारांमधील बसच्या देखभाल-दुरूस्तीबाबत मुख्य अभियंता अनभिज्ञ असतात. सध्या किती बस मार्गावर आहेत, किती बस कोणत्या कारणासाठी उभ्या आहेत, कोणत्या आगारातील भांडारामध्ये कोणते व किती सुट्टे भाग आहेत, त्यांची मागणी, कंपन्या व दर्जा याची पुरेशी माहिती नसते. आगारातून बाहेर पडलेल्या बसमध्ये असलेल्या त्रुटी कागदावरच राहतात. त्या वरिष्ठांपर्यंत पोहचत नाहीत. त्याचा पाठपुरावा होत नाही. परिणामी सातत्याने ब्रेकडाऊन होते. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षा नयना गुंडे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या डिजिटायझेशनमुळे या गोष्टींना आता आळा बसणार आहे.

..........................................

असे होईल डिजिटायझेशन?पीएमपीचे एकुण १३ आगार आहेत. तसेच दोन-तीन आगार वगळता अन्य आगारांमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीचे कामे होतात. तिथे भांडार विभाग आहे. ही सर्व आगारे व भांडार विभाग स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाशी संगणक प्रणालीद्वारे जोडले जाणार आहेत. आगारामध्ये उपस्थित कर्मचारी, त्यांना दिलेली कामे, सुस्थितीतील व बंद बस, बसमधील त्रुटी, भांडार विभागात उपलब्ध सुट्टे भाग, मार्गावर जाणाऱ्या बसची सर्वप्रकारची माहिती सातत्याने अद्ययावत केली जाईल.

...........................

चालक-वाहकांना ड्युटीचे एसएमएसचालक व वाहकांना कोणत्या मार्गावर ड्युटी आहे, बस कोणती, ती कुठे असेल याची माहितीही  एसएमएसद्वारे पाठविण्याचे नियोजन आहे. सध्या त्यांना आगारात आल्यानंतर याबाबत माहिती मिळते.

बसमधील डिझेल कळणारसध्या ताफ्यात असलेल्या बसमध्ये किती डिझेल भरले, फेरीनंतर किती गेले, किती शिल्लक राहिले हे कळण्यासाठी इंधन टाकीला सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक बसचा इंधन खर्चही लगेच समजणार आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम व कार्गोएफएल यांच्या सहकायार्ने रोड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आरटीएमएस) ही संगणकप्रणाली विकसित केली जात आहे. त्याआधारे पीएमपीची डिजिटल वाटचाल सुरू झाली आहे. टप्याटप्याने हे काम पुर्ण केले जातील. कर्मचाºयांना आॅनलाईन प्रशिक्षणही दिले जात आहे.- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी-----------  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलdigitalडिजिटल