शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी मार्ग खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 23:52 IST

खोरवडी (ता. दौंड) येथील स्मशानभूमी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील स्मशानभूमी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. खोरवडी ग्रामपंचायतीने गावातील मृतांच्या अंत्यविधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाच्या निधीअंतर्गत भीमा नदी परिसरात टोलेजंग स्मशानभूमी बांधण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही केली. त्यामुळे काही कालावधीसाठी अंत्ययात्रेच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या. मात्र, काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर खोदाई केली. या प्रकरणी ग्रामपंचायतीने दौंड पंचायत समिती व दौंड तहसील कचेरीमध्ये संबंधित विभागांकडे रस्ताखोदाई प्रकरणी लेखी तक्रारीही केल्या. मात्र, पंचायत समिती आणि महसूल यंत्रणेने या बाबतीत कुठलीच कारवाई न केल्यामुळे नागरिकांना तसेच अंत्यविधीस येणाऱ्यांना या रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. पूर्वीहा रस्ता मोठ्या प्रमाणावर लांब व रुंद असल्याने ग्रामस्थ, शेतकरी यांना वापरासाठी हा सोयीस्कर रस्ता होता. मात्र, आज ग्रामस्थ, शेतकरी, आर्वी, अनगरे येथून येणारे दुग्धव्यावसायिक, शालेय विद्यार्थी यांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याची खंत सरपंच राजेंद्र गुन्नर, भगवान सोनवणे तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की स्मशानभूमीचा रस्ता जर गायरान किवा गावठाण हद्दीत असेल, तर मला आदेश देता येतात. मात्र, हा रस्ता शेतातील असल्याने त्याचे आदेश देण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. तसेच ग्रामपंचायतीने त्याची दुरुस्ती करायची असते. (वार्ताहर)