शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:26 IST

जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा

पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मागील अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आज अखेर तो हजर झाला आहे. यावरून महाराष्ट्रात चांगलेच रान पेटले आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत टीका करण्यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा कराड शरण आल्याच्या प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. 

संभाजीराजे म्हणाले, कराडची शरणागती हे सी आय डी चे यश नाही. थोडं फार सरकारवर जो आम्ही दबाव टाकला होता, त्यातून हा मानसिक दबाव वाल्मीक कराड वर आला असेल. २२ दिवस आरोपी बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो. अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो.  काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे. वाल्मीक कराड ७ आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने १४ गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मीक कराड यांच्यावर मोक्का लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर मुळीच देऊ नका. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही बोलला नाहीत. २२ दिवसांनंतर वाल्मीक कराड ला कसा सरेंडर झाला. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल मुंडे आणि फडणवीस यांची चर्चा झाली होती आणि आज सरेंडर झाला. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

 

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा 

कुणीही पालकमंत्री पद घ्याव पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये. मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही, मोठ मन करून आणि बीडच्या जनतेला न्याय देण्यासाठी राजीनामा द्यायलाच हवा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेwalmik karadवाल्मिक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस