शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केली? आरोपीच्या वकिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:16 IST

पुणे -  मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्रांचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने ...

पुणे -  मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्रांचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून, न्यायालयात मारहाणीबाबत तक्रार दाखल केली आहे. यावर न्यायालयाने १४ जुलै रोजी पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

८ जुलै रोजी गणेश मोहिते याला येरवडा कारागृहातून अटक करण्यात आली. आरोप होता की, मुळशीच्या जंगलात ७-८ पिस्तुलांचा वापर करून गोळीबाराची चाचणी करण्यात आली. या कारवाईसाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंगचा आधार घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

मात्र, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की, सासवड पोलिस ठाण्यात यापूर्वीच जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा दाखल असून त्याच प्रकरणातील आरोप पुन्हा नव्याने नोंदवत, पौड पोलिसांनी शस्त्र कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला. यामुळे एकाच प्रकरणावर आधारित दोन गुन्हे दोन ठिकाणी दाखल करण्यात आले, असा आरोप करण्यात आला.

वकिलांचे आरोप

बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रसन्नकुमार जोशी, ॲड. प्रथमेश गांधी आणि ॲड. साक्षी कुसाळकर यांनी न्यायालयात यासंदर्भात अर्ज दाखल करत, खालील मुद्दे उपस्थित केले:

न्यायालयास दिशाभूल करणारी माहिती दिली गेली.खोटे पुरावे आणि बनावट कागदपत्र सादर करण्यात आले. सासवड पोलिसांनी अटकपूर्व जामीन दिलेल्या आणि नोटीस देऊन सोडलेल्या आरोपींची माहिती पौड पोलिसांनी लपवली.याच माहितीच्या आधारे गणेश मोहितेची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.

कायद्यानुसार गुन्हा?बचाव पक्षाने दाखल केलेल्या अर्जात, भारतीय न्याय सुरक्षा संहितेचे कलम २२३, २२५, २३४, २३६ यांचा आधार घेत पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने यावर विचार करत, पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र