पुण्यात धुळवडीच्या सणाला गालबोट! मार्केट यार्डातील आंबेडकरनगरमध्ये गोळीबार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:07 IST2023-03-08T15:03:23+5:302023-03-08T15:07:38+5:30
मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले...

पुण्यात धुळवडीच्या सणाला गालबोट! मार्केट यार्डातील आंबेडकरनगरमध्ये गोळीबार, एक जखमी
बिबवेवाडी (पुणे) : पुण्यासह दक्षिण उपनगरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना या उत्सवाला गालबोट लागले आहे. मार्केट यार्डातील आंबेडकरनगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर गोळीबार करण्यात आला. यामध्ये प्रशांत उर्फ पर्या श्रीकांत गळवी, (वय ४०, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रशांतला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर संतोष वामन कांबळे (वय ३५) याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील साथीदारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. दरम्यान, हाणामारीत पिस्तुलातून गोळीबार झाला, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.