आळेफाटा : ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात ढोल ताशा पथकाचा एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.संजय रखमाजी त्रिभुवन (वय ५०) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपुर (अहमदनगर) येथील पूनम ढोल पार्टीचे पथक मुंबई येथील गणेश उत्सव कार्यक्रमात वाजवून टेम्पोतून (क्रमांक एमएच १४, डीएम. २८२९) कल्याण नगर महामार्गाने परतत असताना आळेफाट्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडगाव आनंद परिसरात समोरून येणाऱ्या दुधाचा टॅकर (एमएच १४ बीजे ६८९६ ) यांची समोरासमोर धडक झाली.
आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 17:11 IST
शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली.
आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार
ठळक मुद्देअपघातानंतर जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल