शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विकास प्रकल्प पुण्याबाहेर तरी विरोधक गप्प का?

By admin | Updated: May 18, 2015 05:45 IST

पुणे शहरामागून नागपूरच्या मेट्रोला मान्यता मिळून काम सुरू झाले. त्यानंतर पुण्यातील प्रस्तावित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरला गेले

पुणे : पुणे शहरामागून नागपूरच्या मेट्रोला मान्यता मिळून काम सुरू झाले. त्यानंतर पुण्यातील प्रस्तावित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरला गेले. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला करण्यास मान्यता मिळाली. अशा पद्धतीने एकामागेएक विकास प्रकल्प पुण्याबाहेर जात असताना विरोधी पक्ष असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते गप्प का? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. गेली १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. या काळात पुण्याचे नेतृत्व माजी खासदार सुरेश कलमाडी व अजित पवार यांनी केले. मात्र, रस्ते, पाणी व वीज या मूलभूत सुविधांशिवाय पुणेकरांच्या पदरात काही पडले नाही. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरात पुणेकरांनी शतप्रतिशत भाजपाला निवडून दिले. सध्या शहरात एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, आठ आमदार व खासदारही भाजपाचे आहेत. त्यामुळे पुणेकरांना भाजपा सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्र्ष आणि राज्यातील महायुतीच्या सत्तेला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या काळात राज्यात हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. त्यामध्ये पुण्याची मेट्रो, रिंगरोड, समाविष्ट गावे, वेगळी महापालिका, पीएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, म्हाडाचा २.५ एफएसआय आदी विषयांवर चर्चा झाली. मात्र, ‘पीएमपीआरडी’ची स्थापना याशिवाय प्रलंबित इतर प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.मेट्रोच्या वादग्रस्त मार्गाविषयी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, पुण्यामागून नागपूर मेट्रोला केंद्राची मंजुरी मिळून काम सुरू झाले. पुण्यात प्रस्तावित ‘आयआयएम’ राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे नागपूरला गेले. आता ‘आयआयटी’ पुण्याऐवजी नागपूरला जाण्याची चर्चा आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी व आंदोलने केली जात आहेत. मात्र, गेल्या आठवड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव आणून उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तर पुण्याला केवळ आश्वासन मिळाले. त्याविषयी सत्तेत असूनही शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, विरोधक असलेले शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते कुठेही नाराजी सोडा ‘ब्र’ काढताना दिसले नाहीत.