शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

संविधान घराघरापर्यंत पोहचविण्याचा निर्धार; पुरोगामी संघटना राबविणार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 3:34 PM

एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, लोकायतसह पुण्यातील विविध पुरोगामी संस्था संघटनांनी संविधान जागर अभियान समिती स्थापन केली आहे. या समितिच्या वतीने संविधान जागर अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे२८ आॅक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता संविधान जागर अभियानाला सुरूवात केली जाईल.एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, लोकायतसह पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांचा पुढाकार

पुणे : संविधान घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, लोकायतसह पुण्यातील विविध पुरोगामी संस्था संघटनांनी संविधान जागर अभियान समिती स्थापन केली आहे. या समितिच्या वतीने २६ आॅक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध ठिकाणी संविधान जागर अभियान राबविले जाणार आहे. भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथून दिनांक २८ आॅक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता संविधान जागर अभियानाला सुरूवात केली जाईल. हे अभियान २६ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहिल. संविधान जागर अभियान समितीमध्ये फुले-शाहु आंबेडकर विचारमंच, शाहीन फ्रेंड सर्कल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, लोकायत, सोशलिस्ट पार्टी (इंडिया), मुस्लीम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, स्वराज अभियान, आजाद कलम के लिए, जनगर्जना मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, संविधान जागर अभियान समिती (आंबेडकर नगर) आदींचा सहभाग राहणार आहे.संविधान देशासाठीचा मुलभूत कायदा आहे. उद्याच्या भारताबद्दल स्वातंत्र्य चळवळीच्या शहिदांनी आणि नेत्यांनी पाहिलेले महास्वप्न म्हणजे ‘भारतीय संविधान’ आहे. पण आज संविधानाबद्दल, संविधानाने दिलेल्या अधिकारांबद्दल आणि संविधानाने नागरिकांकडुन अपेक्षिलेल्या कर्तव्यांबद्दल बहुसंख्य नागरिकांना फारशी माहिती नाही. या अभियानातून संविधांनाबदद्ल नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणे