Pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 19:00 IST2023-09-21T19:00:09+5:302023-09-21T19:00:52+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे स्वागत ...

Deputy Chief Minister Devendra Fadnavis took darshan of 'Dagdusheth' Ganpati | Pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

Pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात देवेंद्र फडणवीस यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis took darshan of 'Dagdusheth' Ganpati