उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 02:06 PM2021-06-15T14:06:38+5:302021-06-15T14:09:56+5:30

३१ मेला झाला होता गोळीबार, आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले गंभीर गुन्हे दाखल

Deputy Chief Minister Ajit Pawar's close aide Raviraj Taware Mocca action against the accused in the shooting case | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय व आर्थिक फायदा मिळवण्याच्या हेतूने रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

बारामती: माळेगाव येथील राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळिबार करणाऱ्या आरोपींवर बारामतीपोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास करून मोका अंतर्गंत कारवाई केली आहे. त्यामुळे बारामतीतील संघटीत गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होणार आहे. याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते व पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

माळेगाव येथील संभाजीनगरमध्ये दिनांक ३१ मेला सायंकाळी सातच्या सुमारास रविराज तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत संभाजीनगर येथे स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेऊन पुन्हा चारचाकीकडे येत असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली होती. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी फिर्याद दिली होती. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी केलेल्या विकास कामाचा रोषातून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी धमकावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.  तसेच राजकीय व आर्थिक फायदा मिळवण्याच्या हेतूने रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. आरोपींनी हत्येचा कट रचून अल्पवयीन मुला मार्फत गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले ९ गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत.

प्रशांत पोपटराव मोरे (वय,४७.रा. माळेगाव कारखाना), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबल कृष्णांंत यादव मोरे व एक अल्पवयीन अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. याच्यावर ९, विनोद उर्फ टॉम मोरे याच्या वर ७, राहूल उर्फ रिबल मोरे याच्यावर २ तर अल्पवयीनावर वर १ गुन्हा दाखल आहे. सदर गोळीबार प्रकरण हे संघटितपणे गंभीर हिंसाचार करून त्यात घातक शास्त्राचा वापर करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांचे वाढीव कलम लावण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली आहे. 

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's close aide Raviraj Taware Mocca action against the accused in the shooting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.