शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

शिक्षण विभागाच्या परीक्षा होतात; आयोगाच्या का नाही? 'एमपीएससी'ला विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 21:55 IST

संयुक्त परीक्षेची तारीख जाहीर करा...

पुणे: राज्यातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने शालेय शिक्षण विभागातर्फे विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) / राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त परीक्षेची (कंबाईन) तारीख सुध्दा आता आयोगाने जाहीर करावी,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, सातत्याने ढकलल्या जात असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या ९ ऑगस्ट रोजी तर अकरावी प्रवेशाची सीईटी येत्या २१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीने सुध्दा संयुक्त परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात.

एमपीएससीतर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली आहे.---------------------- एकूण किती जागांसाठी होणार परीक्षा : ८०६ पोलीस उपनिरिक्षक : ६५० राज्य कर निरिक्षक  : ८९सहायक कक्ष अधिकारी  : ६७

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार