शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By नितीन चौधरी | Updated: May 24, 2023 16:53 IST

या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला...

पुणे : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये सुमारे ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून ही आकडेवारी स्पष्ट झाली असून या नुकसानीपोटी भरपाई म्हणून १ कोटी रुपयांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला.

राज्यात एप्रिलमध्ये बहुतांश जिल्ह्यांत अवकाळीचा कहर झाला होता. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ५७०.०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या पंचनाम्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्या सर्वाधिक २०६.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान आंबेगाव तालुक्यात तर सर्वात कमी १.४३. हेक्टरवरील शेतीचे नुकसान पुरंदर तालुक्यात झाले आहे. या अवकाळीचा फटका आंबेगाव तालुक्यातील ८४५ शेतकऱ्यांना बसला आहे. तर सबंध जिल्ह्यात २ हजार ५५ शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या पावसामुळे जिल्ह्यातील १९३ गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी या नुकसानीपोटी सुमारे १ कोटी १ लाख रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याच अहवालानुसार शेतजमिनीचे नुकसान झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

११ महिन्यांत ४० हजार हेक्टरला फटला

नैसर्गिक आपत्तीमुळे जून २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात जिल्ह्यात तब्बल ४० हजार ४३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीपोटी ७८ कोटी ४८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ७७ कोटी ४७ लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली असल्याचेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या वर्षभरात १ हजार ४०७ गावांमधील ९८ हजार ७१ शेतकऱ्यांना फटका बसला.तालुकानिहाय नुकसान (एप्रिल)तालुका गावे शेतकरी क्षेत्र (हे.)

शिरूर २ ६ १.४८खेड २० ३०१ ९१.२३

आंबेगाव १९ ८५४ २०६.१२इंदापूर १८ ११६ ३१.४६

दौंड १ १४ ४भोर ४० १६५ ४०.८७

मुळशी १५ १३८ ६१.९१वेल्हा २१ ५० ८.०५

मावळ ३४ १८४ ७४.४३हवेली २० २३२ ४८.१५

पुरंदर ३ ४ १.४३एकूण १९३ २०५५ ५७०.०१

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी