शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात स्वीटकॉर्नला मागणी : शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:24 IST

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्व पर्यटनस्थळे हाऊस फुल झाली असून, पुणे, मुंबईसह हैद्राबाद, अहमदाबाद आदी सर्व ठिकाणांहून स्वीटकॉर्नला मागणी वाढली आहे.

पुणे : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्व पर्यटनस्थळे हाऊस फुल झाली असून, पुणे, मुंबईसह हैद्राबाद, अहमदाबाद आदी सर्व ठिकाणांहून स्वीटकॉर्नला मागणी वाढली आहे. सध्या मार्केट यार्डात दररोज ५० ते ६० टन आवक होत आहे. मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळाला आहे.सध्या स्वीटकॉर्नला प्रतिकिलोस १५ ते १८ रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी पांडूरंग सुपेकर यांनी दिली.   गतवर्षी दुष्काळामुळे स्वीटकॉर्नच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला होता. उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत होता. यंदादेखील स्वीटकॉर्नच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. यामुळे मार्केट यार्डात सध्या केवळ पन्नास टक्केच आवक होत असल्याने चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षी दहा ते बारा रुपये प्रतिकिलो दर मिळाले होते. परंतु यंदा त्या तुलनेत तीस ते चाळीस टक्क्यांनी दर वाढले आहेत़. गुलटेकडी मार्केट यार्डात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागातून तर काही प्रमाणात नाशिक जिल्ह्यातून देखील स्वीटकॉर्नची आवक होत आहे. सध्या दररोज सुमारे ५० ते ६० टन इतकी आवक होत आहे. गेल्या वर्षी या काळात दररोज सुमारे १०० ते १२५ टन इतकी आवक होत होती़. महाबळेश्वर, खडकवासला, लवासा, लोणावळ्यासह विविध पर्यटनस्थळे आणि परराज्यातून हैदराबाद येथून मागणी आहे. गुजरात, बडोदा येथून मागणी आहे. तुलनेने आता आवकही वाढली आहे़. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड