शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा बैलगाडा मालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 1:16 PM

बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे.

हनुमंत देवकर/चाकण : यात्रा व जत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अन्यथा रास्ता रोकोसह जन आंदोलन करण्याचा इशारा चाकण परिसरातील बैलगाडा मालकांनी दिला आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा, गाडा शौकिनांचा आवडता छंद आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून राज्य शासनाने गाड्यांच्या शर्यतीवर बंदी आणून गाडामालक व शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. न्यायालयानेही या शर्यतींवर बंदी घातली.

मात्र त्याबाबत लढा देऊनही अद्याप शर्यती सुरु करण्यासाठी यश मिळाले नाही. बैल हा उत्तम शेती करून शेतकऱ्यांचा उदर निर्वाह चालवतो. शेतकरी बैलांची जीवापाड काळजी घेतो. बैलपोळा या सणाला बैलांना सजवून गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढतो. मात्र बैलगाडा शर्यतीवर का बंदी आणली जाते या बाबत अजूनही शेतकरी संभ्रमात आहे. ऐन यात्रा काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असताना सरकार मात्र त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गाडामालक व शेतकऱ्यांनी केला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी त्वरित उठवून गाडा मालकांच्या भावनांचा विचार करून पुन्हा शर्यती सुरू कराव्यात अशी मागणी बैलगाडा मालक संतोषशेठ भोसले, जीवन खराबी, सुनील बिरदवडे, शशिकांत कड, राजेंद्र पडवळ, मारुती खराबी, अशोक खराबी, रामदास कड, बाळासाहेब खराबी, राजेंद्र खराबी, नवनाथ शेवकरी, महेश शेवकरी, अशोक बिरदवडे, बाळासाहेब सोपानराव कड, श्रीपती खराबी, बाळासाहेब जाधव, नारायणशेठ जावळे, पप्पू फलके, सुनील फलके, मोहन भांगरे, चंद्रभान पवार, संदीप बाबुराव जाधव, बाळासाहेब नाणेकर, सुनील जाधव, बजरंग कड, संतोष मुळे, संतोष मांडेकर, ज्ञानोबा दवणे, बाळासाहेब पठारे, काका आगरकर, संपतराव येळवंडे, अंकुश येळवंडे, विलासराव येळवंडे, कोंडीभाऊ येळवंडे, भगवान बिरदवडे आदींसह बैलगाडा शौकिनांनी केली आहे.बैलगाडा शर्यतीविना गाव जत्रा पडल्या ओससध्या गावागावांत यात्रा जत्रांचा हंगाम सुरु असून बैलगाडा शर्यती वर बंदी असल्याने गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीला अनन्य साधारण महत्व आहे. गावच्या यात्रांमधून ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते, मात्र शर्यती बंद पडल्याने गाडा शौकिनांनी, पाहुणे मंडळींनी यात्रांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव यात्रांमध्ये होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. यात्रांमधून तळागाळातील छोटे छोटे व्यावसायिक गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवितात.प्रत्येक गावात यात्रा कालावधीत गावामध्ये भेळवाले, कलिंगड विक्रेते, आईस कँडी, पाणी पुरी, पाळणावाले, पानमसाला, टेम्पोवाले, हलगीवाले, वाजंत्री, लाऊड स्पीकर, निवेदक, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, रसवंती, आईस्क्रीम, किराणा दुकानदार, स्वीट सेंटर्स, कापड दुकानदार, विद्युत रोषणाई आदी व्यावसायिक गावागावातील यात्रांवर अवलंबून व्यवसाय करीत असतात. मात्र बैलगाडा शर्यती बंदीमुळे यात्राही ओस पडू लागल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाला आहे.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यत