शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मार्केटमध्ये सुरक्षा रक्षकांकडून बेकायदेशीर वसूली, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:08 PM

महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्दे मार्केट यार्ड परिसरातील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.संबंधित ठेकेदाराकडून घडलेल्या घटनेचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे

पुणे: महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.सुरक्षा रक्षक पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला काढून टाकले आहे.मात्र,केवळ सुरक्षा रक्षकाला काढून प्रश्न सुटणार नाही तर कंत्राटदारावर कारवाई करावी,अशी मागणी केली जात आहे.राज्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खासगी कंत्राटदाराला सुरक्षा व्यवस्थेचे काम देण्यात आले आहे.एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात.त्याचप्रमाणे  परराज्यातून शेतमाल घेऊ आलेली वाहने पुन्हा शेतमाल घेऊन जातात. मार्केट यार्ड परिसरातील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु, वाहतुक कोंडी सोडविण्यात बाजार समिती पूर्णपणे अपयशी ठरली आहे.त्यात सुरक्षेसाठी नियुक्त केलेले खासगी सुरक्षारक्षकच शेतीमाल घेवून येणा-या वाहनचालकांची लुट करत आहेत. शेतमालाची भरलेली वाहने आणि रिकामी वाहने आत-बाहेर सोडण्यासाठी सुरक्षारक्षक पैसे घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतक-यांच्या मालाला कमी भाव मिळत असताना वाहनचालकांकडूनही होणा-या लुटीचा भार शेतक-यांनाच सोसावा लागत आहे.त्यामुळे  बाजार समिती केवळ शेतक-यांची लुट करण्यासाठी स्थापन झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बाजार आवारात सुरक्षा पुरविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिली आहे. वाहन चालकांकडून पैसे घेण्याचा प्रकार घडला त्याच दिवशी संबंधित सुरक्षारक्षकाला काढून टाकण्यात आले.तसेच संबंधित ठेकेदाराकडून घडलेल्या घटनेचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे,असे बाजार समितीच्या पदाधिका-यांकडून सांगितले जात आहे.-------------------------------------------------------------मार्केट यार्डाच्या सुरक्षेसाठी दरमहा 30 लाख रुपये खर्च केले जातात. मात्र,सुरक्षा करणारेच शेतकरी व वाहनचालकांना लुटत असतील तर ते बेकायदेशीर आहे. केवळ शेतमाल घेवून येणा-या वाहनांकडून पैसे घेणा-या सुरक्षारक्षाकाला काढून टाकल्यामुळे प्रश्न सुटणार नाही.तर असे प्रकार कोणाच्या संगनमताने सुरू आहेत,हे समोर आले पाहिजे.त्यासाठी कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी बाजार समिती प्रशासक मंडळाचे संचालक दादासाहेब घाटे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डTrafficवाहतूक कोंडी