शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

चिमुरड्यांच्या पुस्तकांवर उड्या, श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 2:36 AM

बालदिन : श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : दिवाळीचा फराळ संपत आला असला तरी सुट्टी आणि बालदिनाचे औैचित्य साधून चिमुरड्यांच्या खाद्य फराळावर उड्या पडल्या. मुलं वाचत नाहीत, ही ओरड खोटी ठरवत अनेक मुलांनी पालकांसह पुस्तकांच्या दुकानात जाऊन आवर्जून खरेदी केली. आॅनलाइन खरेदीच्या माध्यमातूनही बालसाहित्याची मागणी वाढलेली दिसली. श्यामची आई, हॅरी पॉटर, राधाचं जग आदी पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती.

मॉल संस्कृती, मल्टिप्लेक्समधील झगमग, मोबाइल, टीव्हीकडील वाढता कल यामुळे मुले वाचनापासून दूर होत आहेत, हे वास्तव असले तरी वाचनसंस्कृतीचे भविष्य आजही आशादायी असल्याचे चित्र बालदिनी पाहायला मिळाले. मुलांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने बऱ्याच पालकांनी मुलांना इतर भेटवस्तू देण्याऐवजी पुस्तकखरेदीला पसंती दिली. आकर्षक मुखपृष्ठ, सोपी मांडणी, सहजसुलभ भाषा यामुळे मुले पुस्तकाकडे आकर्षित झाली. बालदिनानिमित्त पुस्तकांची दुकाने तसेच आॅनलाइन संकेतस्थळांवर १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली होती.

दिलीप प्रभावळकर यांचे बोक्या सातबंडे, राजीव तांबे यांची मांजरू, मोरू, मगरू ही सीरिज, साने गुरुजींचे श्यामची आई, अरुणा ढेरे यांचे सुंदर जग हे, माधुरी पुरंदरे यांचे राधाचं जग या पुस्तकांना बालदिनी जास्त मागणी असल्याचे अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. फास्टर फेणेबद्दल अनेकांकडून विचारणा करण्यात आली. आचार्य अत्रे यांचे कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, ना. धो. ताम्हणकर यांचे गोट्या या पुस्तकांचा खपही वाढला. इतर वेळच्या तुलनेत बालसाहित्याच्या खरेदीत २०-२५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.अनुवादित बालसाहित्यालाही मिळतेय पसंतीअनुवादित बालसाहित्यालाही यानिमित्ताने चांगली पसंती मिळाली.हॅरी पॉटर, फ्रँकलिनचा सेट, हॅनाची सुटकेस या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश होता.

ज्योत्स्ना प्रकाशनातर्फेमाधुरी पुरंदरे यांची सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित केली असल्याने इंग्रजी माध्यमातील मुलांकडून खरेदी करण्यात आली.राजा शिवछत्रपती, जाणता राजा, विक्रम वेताळ, बोलकी थैैली, अकबर-बिरबल या पुस्तकांना छोट्या वाचकांनी पसंती दिल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसकडून सांगण्यात आले.आॅनलाइनपुस्तक खरेदीबालसाहित्याची खरेदी आॅनलाइन पद्धतीनेही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. रस्ता, प्रवास, न ऐकलेली गोष्ट, पाऊस ही आॅडिओ बुक्स, डोंगरगावची चेटकीण, सोनूचे साहस, तेनालीरामाच्या चातुर्य कथा अशी पुस्तके आणि किंडल यांना पसंती देण्यात आली. जेरिनिमो सीरिज, हॅरी पॉटर, जंगल बुक या पुस्तकांना नेहमीप्रमाणेच जोरदार पसंती मिळाली. 

टॅग्स :children's dayबालदिनPuneपुणे