शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:13 PM

विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे.

ठळक मुद्देलोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या अस्तरीकरणाचे काम केले जाणारदैनंदिन कामांचे नियोजन कोलमडण्यासह आर्थिक फटकाही सहन करावा लागणार

पुणे : धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामासाठी विमानतळ रात्री बंद राहणार असल्याने पुण्यातून दिल्लीसाठीचे पहिले विमान सकाळी ८.०५ वाजता उड्डाण करणार आहे. हे विमान सकाळी १०.१५ दिल्ली विमानतळावर उतरेल. त्यामुळे पुण्यातील विमान प्रवाशांसाठी दिल्ली दरवाजा थेट १० नंतरच उघडला जाणार आहे. तर सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शेवटचे उड्डाण असणार आहे.

लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या अस्तरीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सोमवार (दि. २६) पासून विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत बंद राहणार असल्याने विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावेळेतील विमानांची उड्डाणे दिवसभरातील विविध वेळांमध्ये बदलण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी यापुर्वीच दिली होती. पण हे बदल केले तरी पुण्यातील पहिले उड्डाण सकाळी ८ नंतरच होणार असल्याने अन्य शहरांमध्ये पोहचण्यासाठी जवळपास दहाच वाजणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या दैनंदिन कामांचे नियोजन कोलमडण्यासह आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.

विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे. पुण्यातून सर्वाधिक विमानांचे उड्डाण दिल्लीकडे होते. पुण्यातून दिल्लीचे पहिले विमान सकाळी ८.०५ वाजता उड्डाण करेल. हे विमान १० वाजून १५ मिनिटांनी दिल्लीत उतरेल. दिवसभरात थेट ११ विमाने दिल्लीला जातील. पण पुण्यातून दिल्लीत जाणारे अनेक उद्योजक, कंपन्यांचे अधिकारी, गुंतवणुकदार, राजकीय नेते, पर्यटक तसेच दिल्लीतून अन्य शहरांसाठी विमानाने प्रवास करणारे प्रवासी आदींना दिल्लीत पोहचण्यासाठी सव्वा दहा वाजणार आहेत. विमानतळावरून बाहेर पडण्यासह इच्छितस्थळी जाण्यासाठी त्यांना पुढे किमान एक ते दीड तास लागु शकतो. या वेळांनुसारच पुण्यातून दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये जाणाऱ्यांना कामाचे नियोजन करावे लागणार आहे.--------------दिल्लीतून पुण्यात येण्यासाठी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पहिले तर सायंकाळी साडे पाच वाजता शेवटचे विमान आहे. त्यामुळे एका दिवसात पुणे-दिल्ली-पुणे असा प्रवास करायचा असल्यास विविध कामांसाठी केवळ पाच ते सहा तासांचाच वेळ मिळतो. त्यातच सकाळी विमानाला विलंब झाल्यास हा वेळ आणखी कमी होईल. तर दिल्लीतून विमान उड्डाणाला ३० मिनिटे विलंब झाला तरी ते रद्दच करावे लागणार आहे. असे झाल्यास दिल्लीत मुक्काम करावा लागू शकतो. तसेच दिल्लीतून सकाळी १० पुर्वी अन्य विमान पकडायचे असल्यास पुण्यातून आदल्यादिवशी सायंकाळी ७.४० चे शेवटच्या विमानानेच दिल्ली गाठावी लागेल.--------------पुण्यातून विमान उड्डाणांची स्थिती (दि. २७ ऑक्टोबर)पुणे ते दिल्ली - उड्डाण सकाळी ८.०५, उतरणार १०.१५उड्डाण सायं. ७.४०, उतरणार रात्री ९.४५दिल्ली ते पुणे - उड्डाण सकाळी ६.३०, उतरणार सकाळी ८.४०उड्डाण सायंकाळी ५.३०, उतरणार सायंकाळी ७.३५पुणे ते हैद्राबाद - पहिले उड्डाण दुपारी २.१५, शेवटचे ६.१०पुणे ते नागपुर - उड्डाण दुपारी १.५०पुणे ते बेंगलुरू - पहिले उड्डाण दुपारी ४, शेवटचे सायंकाळी ७.४५पुणे ते चेन्नई - पहिले उड्डाण सकाळी ८.४५, शेवटचे सकाळी ९.१०

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीairplaneविमानpassengerप्रवासीpune airportपुणे विमानतळ