शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड, विकासनगर परिसरात रोजच्या ‘बत्ती गुल’ने नागरिक हैराण

By admin | Updated: July 6, 2015 04:51 IST

देहूरोड, विकासनगर परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दररोज कोणत्याही वेळी वीजपुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले जात आहे.

किवळे : देहूरोड, विकासनगर परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दररोज कोणत्याही वेळी वीजपुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले जात आहे. गेल्या काही दिवसात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभाराला विकासनगर व देहूरोड परिसरातील नागरिक कंटाळले असून, एखाद्या दुर्गम भागात तर आपण राहत नाही ना, असे येथील नागरिकांना वाटू लागले आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेक बहुमजली इमारतींतील सदनिकांमध्ये पंपाद्वारे पाणी चढविता येत नाही. बहुमजली इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना उद्वाहक (लिफ्ट) बंद पडल्याने चढ-उतार करण्यासाठी खूप त्रास होत आहे. पिठाची गिरणी बंद पडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल यांच्या पुढाकाराने देहूरोड महावितरण कार्यालयावर नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्या वेळी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. पेठकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून महिनाभरात देहूरोडसाठी मळवली फीडर लिंक करण्याचे काम करण्यात येणार आहे. वाहिन्यांचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्यात येणार आहे. चिंचवड येथून पुरवठा होत असून, पंधरा-वीस दिवसांत देहूरोडला स्वतंत्र पुरवठा देण्याबाबत काम सुरू करण्यात आले आहे, असे लेखी दिले होते. नंतर महिनाभर पुरवठ्यात सुधारणा झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असून, चिंचवड येथून वीजपुरवठ्यात व्यत्यय आणला जात असल्याचे सांगितले जात आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरळीत होत होता. त्यामुळे पुन्हा आंदोलन केल्यावरच पुरवठा सुरळीत होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)