शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मालिकांतून संस्कृतीचे अध:पतन

By admin | Updated: March 26, 2015 00:22 IST

सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत.

पुणे : सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत. परदेशातील लोकप्रिय टॉक शोची नक्कल करून रिअ‍ॅलिटी शो आणले जात आहेत. मालिका या बुद्धी भ्रष्ट करण्याचे माध्यम बनत आहेत. या करमणुकींना वेळीच मर्यादा घातल्या नाहीतर संस्कृतीचे अध:पतन होण्यास वेळ लागणार नसल्याचे परखड मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित ‘सहचारिणी’ महिला विशेषांक आणि ‘रणरागिणी पुरस्कार’ वितरणाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे, शिवराज घुले, शांताराम इंगवले, अमित कंधारे आणि स्मरणिकेच्या संपादिका वेणू शिंदे उपस्थित होत्या. या वेळी निकम यांच्या हस्ते डॉ. सुचिता फाळके, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता जाधव, विद्या बागल, हलिमा कुरेशी, सुजाता तापकीर आदी विविध क्षेत्रांतील महिलांना ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. निकम म्हणाले, ‘‘स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कठोर कायदे झाले पाहिजेत, अशी मागणी होते. मात्र, याचा मुकाबला स्त्रियांनीच केला पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. एकतर्फी प्रेम हा व्यवस्थेचा दोष की चित्रपट-मालिकांचा, असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)४‘संस्कृती’ हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. माणूस हा शिक्षणाने शिक्षित होतो; पण सुसंस्कृत नाही. त्यासाठी चांगल्या आचार-विचारांची गरज असते. स्त्री हे तर कुटुंबाचे बलस्थान मानले गेले आहे. चांगली पिढी घडविण्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. मात्र, स्त्री जबाबदारीची जाणीव पुरूष संस्कृतीला नसल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.