पुणे : पुणे महापालिकेच्या २४ नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात अपात्रतेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही उमेदवारांनी विजयी उमेदवारांना न्यायालयात खेचले आहे. महापालिकेची निवडणूक चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाली. त्यात १६५ जागांपैकी भाजपला ११९, राष्ट्रवादी (अजित पवार) २७, काँग्रेस १५, राष्ट्रवादी (शरद पवार) ३ आणि उद्धवसेनेचा १ नगरसेवक निवडून आला आहे. त्यामधील तब्बल २४ नगरसेवकांविरोधात लघुवाद न्यायालयात अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
निवडणूक निकाल लागल्यानंतर त्या निकालाबाबत आक्षेप असल्यास दहा दिवसांच्या आत याचिका दाखल करणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार या मुदतीत उमेदवारांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून महापालिकेला २४ नगरसेवकांविरोधात दाखल झालेल्या याचिकांचे बाबतचे समन्स मिळाले असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नियमानुसार महापालिकेच्या या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे समन्स न्यायालयाकडून बजाविले जाते. बहुतांश पराभूत उमेदवारांकडूनच या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता निवडून आलेल्या या सर्व २४ नगरसेवकांना कालावधीमध्ये आपले नगरसेवकपद वाचवण्यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागणार आहेत.
Web Summary : Pune: Twenty-four newly elected corporators face disqualification petitions after defeated candidates challenged their victories. Following delayed elections, numerous petitions were filed within the stipulated timeframe, requiring the corporators to defend their positions in court.
Web Summary : पुणे: पराजित उम्मीदवारों द्वारा जीत को चुनौती देने के बाद चौबीस नवनिर्वाचित पार्षदों को अयोग्यता याचिकाओं का सामना करना पड़ रहा है। विलंबित चुनावों के बाद, निर्धारित समय सीमा के भीतर कई याचिकाएँ दायर की गईं, जिसके लिए पार्षदों को अदालत में अपनी स्थिति का बचाव करने की आवश्यकता है।