शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:53 IST

महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव

ठळक मुद्देभाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने रासने यांचा होता विजय निश्चित

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची बहुमताने निवड करण्यात आली. रासने यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव केला. रासने यांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत संपल्याने यावर्षीच्या (२०२०-२१) अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. अर्ज मागे घेण्याकरिता १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. आधी पठारे यांच्याकरिता मतदान घेण्यात आले. त्यांच्याबाजूने महाविकास आघाडीची सहा मते पडली. तर रासने यांच्या बाजूने दहा मते पडली. बहुमत रासने यांच्या बाजूने असल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी विजयी घोषित केले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. निवडणुकीपुर्वीच रासने यांचा विजय गृहीत धरुन पालिकेच्या बाहेर ढोल-ताशे वाजविण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे हे आमदार झाल्याने पक्षाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या जागी रासने यांची वर्णी लागली होती. तीन महिने अध्यक्षपद भुषविलेल्या रासने यांनी नुकतेच सन २०२०-२१ चे ७ हजार ३९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. पुढील वर्षीचे (२०२१-२२) चे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी त्यांनाच मिळणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, खासदार गिरीश बापट, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, नगरसचिव सुनील पारखी, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते. ..........

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस