शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कर्मचा-यांची संख्या कमी, पण उत्साह दांडगा, अग्निशामक दल सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 3:10 AM

दिवाळी, उन्हाळ्याचे दिवस शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते़ तसेच, पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडपडीच्या घटना मोठ्या संख्येने होतात, अशावेळी सर्व जण १०१ क्रमांकावर फोन करून मदत मागतात आणि काही मिनिटांत अग्निशामक दलाचे जवान

पुणे : दिवाळी, उन्हाळ्याचे दिवस शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते़ तसेच, पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडपडीच्या घटना मोठ्या संख्येने होतात, अशावेळी सर्व जण १०१ क्रमांकावर फोन करून मदत मागतात आणि काही मिनिटांत अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने घटनास्थळावर हजर होतात, अशा या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणा-या अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचा-यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या १३ अग्निशमन केंद्रे आहेत़ महापालिकेचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता त्यांची ३० तरी संख्या असण्याची गरज आहे़ महापालिकेच्या हद्दीत नुकताच ११ गावांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे आता त्यांच्यासाठीही अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी तेथे अग्निशामक दलाची केंद्रे उभारावी लागणार आहेत़याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, दिवाळीत आता आहेत त्या सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत़ अग्निशामक दलाकडे हॅड्रोलिक क्रेनपासून बुलेटपर्यंत ७२ वाहने आहेत़ ती सर्व सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़रुग्णवाहिकाही तयारीत ठेवण्यात आल्या आहेत़ नवीन अग्निशमन केंद्रासाठी काही जागा ताब्यात आल्या आहेत़ काहीचे बांधकाम सुरू असून, येत्या ३ वर्षांत ते पूर्ण करणार आहेत़ नवीन गावांच्या समावेशाचा विचार केल्यास त्या ठिकाणी जागा मिळाल्यास नवीन केंद्र उभारण्याचा विचार होऊ शकेल़रॉकेट, पॅराशूटमुळेच आगीच्या घटनादिवाळीत प्रामुख्याने आग लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे़गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आग लागण्याला कारणीभूत ठरतात़ त्यातील आग या रॉकेट आणि पॅराशूट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता, ते इकडे तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचराकुंडी, झाडे पेटून आग लागल्याच्या घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाके उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़फटाके उडविताना घ्यावयाची दक्षतालहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्या सोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे़पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरुन खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़फटाके उडविताना टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरु नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़भुईनाळे हातात धरुन उडवू नयेत़भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरुन उडवू नयेत़फटाके न फुटल्यास अशा फटाक्यांची दारू काढून ते पेटवू नयेत़ त्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडूनबºयाचदा आग लागते़त्यामुळे दिवाळीत टेरेसवरीलतसेच बाल्कनीमधील टाकाऊतसेच अन्य वस्तू काढूनटाकाव्यात़फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील, अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरुन झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरित पाण्यात टाकावी़खिडक्या, दरवाजांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाशी १०१ वर संपर्क साधावा़

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे