शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

पुुरंदर विमानतळावर लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:55 PM

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली.

ठळक मुद्देराज्य शासन घेणार बैठक : प्रस्तावित कामांचा घेतला जाणार आढावा

पुणे : केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीत पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुढीत दोन ते तीन दिवसांत सिन्हा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्य शासनाबरोबर लवकरच बैठक घेऊन विमानतळाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी या बैठकीत उपस्थित होते. त्यात  विमानतळाच्या प्रस्तावित जागेसाठी सध्या अस्तित्वात असणारे जोडरस्ते, प्रस्तावित रिंगरोड तसेच रेल्वे आणि मेट्रो यांची विमानतळास जोडणी आदी विषयांवर चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

...................................

पुण्याच्या विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने विविध कामांच्या पाठपुरावा केला जातो. पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना केली होती. त्यावर सिन्हा यांनी मंगळवारी विमानतळाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर राज्य शासनाबरोबर एक बैठक होईल. त्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल.  अनिल शिरोळे, खासदार

..........................भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा.  विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रमात आहेत. त्यामुळे अलीकडेच त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकºयांना भेटून चर्चा व्हायला हव्यात.  सुप्रिया सुळे, खासदार 

टॅग्स :Purandarपुरंदरanil shiroleअनिल शिरोळेSupriya Suleसुप्रिया सुळेJayant Sinhaजयंत सिन्हा