शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित करवाढीचा निर्णय मंगळवारी

By admin | Updated: January 25, 2015 00:06 IST

महापालिकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षातील उत्पन्नात डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपयांची तूट आली आहे.

पुणे : महापालिकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षातील उत्पन्नात डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे २०१५-१६च्या अंदाजपत्रकात जमा-खर्चाचा समतोल साधण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वसाधारण करात प्रस्तावित १८ टक्के करवाढ आणि पाणीपट्टीत सुचविण्यात आलेली सरासरी ९०० रुपयांच्या पाणीपट्टीवर येत्या मंगळवारी (दि. २७) स्थायी समिती निर्णय घेणार आहे. गेल्या महिन्यात प्रशासनाकडून ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आल्यानंतर खास सभा घेऊन हा निर्णय घेण्यात येणार होता. या सभेला अखेर मुहूर्त मिळाला असून, समिती पुणेकरांवर करवाढ लादणार, की प्रशासनास आर्थिक हातभार देणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी स्थायी समितीने तब्बल ४१५० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अवघे २५५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मार्चअखेरपर्यंत त्यात आणखी ५०० कोटींची भर पडण्याची प्रशासनास आशा आहे. मात्र, त्यानंतरही हजार कोटींची तूट येणार असल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकावर पडणार आहे. त्यातच पुढील आर्थिक वर्षात एलबीटी रद्द होण्याची भीती असल्याने प्रशासनाकडून या दोन्ही करवाढी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यातील मिळकतकरातील वाढीमुळे १९२ कोटी रुपये तर, पाणी पट्टीत ७५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रशासनास अपेक्षित आहे. त्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)करवाढीस राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांचा विरोध महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या या दरवाढीस महापालिकेतील राजकीय पक्षांसह शहरातील स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आहे. एकीकडे आर्थिक उत्पन्नासाठी महापालिका पुणेकरांवर करवाढ लादत असली तरी, दुसरीकडे पालिकेची मिळकतकर आणि पाणीपट्टीची थकबाकी हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही करवाढ न करता थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी यापूर्वीच स्थायी समितीकडे करण्यात आली आहे.