शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

डेक्कन क्वीनच्या ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 8:59 PM

डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या सापडल्या होत्या..

ठळक मुद्देसोमवार पेठेत राहणारे सागर काळे यांनी मागील महिन्यात दिली होती तक्रार

पुणे : डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या सापडल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डायनिंग कारमध्ये ऑम्लेटसोबत देण्यात आलेल्या सॉसमध्ये अळी सापडल्याची तक्रार प्रवाशाकडून करण्यात आली होती.सोमवार पेठेत राहणारे सागर काळे यांनी मागील महिन्यात ही तक्रार दिली होती. काळे हे दि. १९ जुलै रोजी डेक्कन क्वीनमधून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी डायनिंग कारमध्ये ऑम्लेट मागविले होते. ते खाण्याआधी त्यांनी सॉस घेतला. त्यानंतर सॉसच्या बाटलीत अळ्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी ‘आयआरसीटीसी’च्या कर्मचाºयांना याबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनी ऑम्लेट बदलून देतो, असे सांगितले. त्यानंतर काळे यांनी आॅम्लेट व सॉसचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओसह त्यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकाराची ‘आयआरसीटीसी’कडून चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे केटरिंग ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने केवळ दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर प्रत्येक तक्रारीनुसार दंडाची रक्कम व कारवाई बदलत जाते, असे अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, रेल्वेने काही वर्षांपुर्वी खासगी ठेकेदाराला डायनिंग कारमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम दिल्यापासून त्याचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे रेल्वेने पुन्हा ही जबाबदारी स्वत:वर घ्यायला हवी, अशी मागणी रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे. तसेच ठेकेदाराला दंड करण्यात आल्याने दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्याला प्राधान्य मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.---------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेfoodअन्न