टाकळीहाजी परिसरात कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया खोळंबली, शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रात फेºया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:19 IST2017-09-11T03:19:13+5:302017-09-11T03:19:19+5:30

टाकळीहाजी परिसरात कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया खोळंबली, शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रात फेºया
टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे
तोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या कर्जमाफीचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये या शासनाविषयी चांगलीच नाराजी पसरली आहे. कारण अतिशय जाचक अटी वापरून ही कर्जमाफी असल्याने याचा फायदा कमी आणि त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरात अनेक शेतकरी अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी कुठे जावे काय करावे हेच माहीत नसल्याने ते भांबावून गेले आहेत. कारण इंटरनेट, आॅनलाईन, सर्व्हर काय आहे. आयुष्यात कधी माहिती नाही ते त्यांना आता ऐकायला मिळत आहे.
शिवाय त्या ठिकाणी जाऊन फॉर्म कसा भरायचा याची किंचितही कल्पना नाही.
तसेच फॉर्म आॅनलाइन भरताना त्यावर काय माहिती भरायची हेदेखील माहिती नाही. शिवाय हा फॉर्म भरताना पती-पत्नी बरोबर असल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने दिवसभर त्या कार्यालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे महिलादेखील या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे वैतागल्या आहेत.
कर्जमाफी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असल्याने आता फक्त १० च दिवस शिल्लक राहिल्याने शेतकरी चांगलेच भेदरले आहेत. कारण दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने या परिसरातील अनेक शेतकरी आॅनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकरी रात्री व पहाटे आपल्या घरमालकिणीला अर्ज भरण्यासाठी घेऊन जात आहेत. या शासनाला जर खरोखरच कर्जमाफी द्यायची होती तर ही प्रक्रिया शासन कशासाठी राबवतेय. कारण शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाबद्दल माहिती शासनदरबारी आहे.
शिवाय प्रत्येक बँकांकडे ही माहिती उपलब्ध असताना शासन शेतकºयांचा का अंत पाहत आहे. यापूर्वी अनेक वेळा कर्जमाफी झाली. परंतु त्या वेळी असा काही प्रकार नव्हता .परंतु हे शासन शेतकºयांचे नसल्याने ते शेतकºयांची अशी क्रूर चेष्टा करीत असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील महिला व्यक्त करीत आहेत.