शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; स्वारगेट पोलिसांची होणार सीआयडीमार्फत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 21:54 IST

साध्या वेशात असलेल्या दोन पोलिसांनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरून अजितसह यलप्पाला ताब्यात घेतले आणि जीपमध्ये बसवून स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणले.

ठळक मुद्दे मोबाइल चोरीच्या संशयातून केली होती अटकशवागार तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर विविध संघटनांमार्फत ठिय्या आंदोलन सुरू

पुणे : मोबाइल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या युवकाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमधील कोठडीत गुरुवारी मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे.  अजित अलापा पुजारी (वय २०, रा. सध्या घोरपडीगाव. मूळ रा. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित हा मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. बहीण आणि दाजी पुणे शहरात राहत असल्यामुळे तो चार दिवसापूर्वी पुण्यात आला होता. गुरुवारी दसरा असल्याने तो फुले आणण्यासाठी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा दाजी यलप्पा तिमाप्पा पुजारी (वय ३० रा. घोरपडीगाव) याच्यासोबत दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे गेला होता. दरम्यान तेथे साध्या वेशात असलेल्या दोन पोलिसांनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरून अजितसह यलप्पाला ताब्यात घेतले आणि जीपमध्ये बसवून स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणले.दोघांकडे पोलिसांनी दोघांकडे चौकशी सुरू केली. मात्र अजितला मराठी आणि हिंदी समजत नव्हती. पोलिसांनी मराठीत बोलत अजितला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे पोटात आणि छातीमध्ये वेदना होत असल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र तरी मारहाण सुरूच होती. वेदना वाढल्याने पोलिसांनी त्याला दोन गोळ्या दिल्याचे यलप्पाने सांगितले. दरम्यान, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो अचानक कोसळला आणि कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यास ससून रूग्णालयात घेवून गेले तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अजितचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा दाजी यलप्पाला पकडून ठेवले होते. शुक्रवारी पहाटे दोन वाजता बी. टी. कवडे रोड येथे त्याला सोडून देण्यात आले. अजितच्या पाठीवर तसेच शरीरावर मारहाणीच्या खुनाही दिसून आल्या. दरम्यान, पोलिसांनी यलप्पाच्या घोरपडीगाव येथील घराची झडती घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यल्लप्पा येल्लूर यांनी सांगितले.       .................................नातेवाईकांचे ठिय्या आंदोलनअजितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वारगेट पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. मारहाण करणा-या आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मात्र, पोलीस तक्रार घेत नसल्याने त्यांनी वडार समाज संघटनांशी संपर्क साधला. संघटनेच्या पदाधिका-यांनी पोलीस आयुक्त कार्यालय, सीआयडी कार्यालयात धाव घेत अधिका-यांची भेट घेतली. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने दिसून आले. शुक्रवारी सकाळपासून ससून रुग्णालयातील शवागार तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर विविध संघटनांमार्फत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये वडार समाजाचे पुणे शहराध्यक्ष संजय डोंगरे, यल्लप्पा येल्लूर, भाजपा युवा मोर्चा ए. एम. एस. सोशल फाउंडेशनचे सौरभ शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ....................पोलीस कोठडीत कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर तहसिलदाराच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात येतो. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर मृत्यू का झाला हे स्पष्ट होईल.- रविंद्र रसाळ, प्रभारी सहायक आयुक्त, स्वारगेट विभाग

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी