पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या बहिण भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:00 IST2018-05-12T16:00:48+5:302018-05-12T16:00:48+5:30
घरासमाेरील पाण्याच्या टाकीत पडून दाेन चिमुकल्या बहिण भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंदापुर तालुक्यातील पळसदेव येथे घडली अाहे.

पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या बहिण भावांचा मृत्यू
पुणे : आईसह दोन मुले घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडल्याने दोन चिमुकल्या बहिण भावांचा मृत्यू झाला. या घटनेत आई जखमी झाली असून ती बेशुद्ध आहे. ही घटना इंदापुर तालुक्यातील पळसदेव येथे शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. प्रतिक महेश बनसोडे आणि कार्तिकी महेश बनसोडे अशी मृत्यू झालेल्या बहिण भावांची नावे आहेत.
आई ही पाणी भरण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेली असावी यावेळी ती पाण्यात पडल्याने दोन मुलेही तीच्या मागोमाग जाऊन ती पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. प्रतिक हा फक्त आठ महिन्याचा तर कार्तिकी आठ वर्षाची आहे. दोघे भावंडे आई सह पाण्यात पडल्याने हा अपघात की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. मुलांच्या आईला इंदापुर शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तीची प्रकृती स्थिर आहे.