शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 12:44 IST

स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून तर १९ जण भाजून जखमी झाले आहे

आळंदी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. ८) सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. प्राथमिक माहितीमध्ये एक - दोन जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर १९ जण जखमी झाले होते. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी जखमी असलेल्या ८१ वर्षीय आजोबांचा मृत्यू झाला. तर आज (दि.१०) पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नंदा संतोष शेळके (रा. पिंपळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. स्फोटात आजपर्यंत चार निष्पाप जीव गेले असून आणखी एक - दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.                सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा ली ही कंपनी आहे. ही कंपनी मागील चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये एल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी सायंकाळी या कच्चा मालाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता खूप असल्याने एक - दोन जणांचा मृत्यू झाला. तर १९ जण भाजून जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या घरांना तडे गेले. काही घरांचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात बांधलेली जनावरे देखील भाजली गेली. तर त्याठिकाणी पार्किंग केलेल्या नऊ दुचाकी  वाहने जळून खाक झाली. स्फोटात आत्तापर्यंत रामचंद्र मारुती निंबाळकर (वय ८१), संतोष त्रंबक माने (दोघे रा. सोळू), नवनाथ पोतंना पांचाळ (वय ५५) व नंदा संतोष शेळके (वय ४०) मृत पावले आहेत. नंदा शेळके या पालेभाज्यांच्या दुकानात भाजी खरेदी करत होत्या. दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाच्या ज्वाळा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. सुमारे ७० ते ८० टक्के शरीर भाजले गेले होते. पुण्यातील खाजगी सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी (दि.१०) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूSocialसामाजिकHealthआरोग्यAlandiआळंदीhospitalहॉस्पिटल