दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगावातील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST2018-01-11T16:58:52+5:302018-01-11T17:03:24+5:30
दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगावातील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
विमाननगर : दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६, रा. ओव्हाळ वस्ती, लोहगाव) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
या घटनेत नरेशदास दादीबा गुप्ता (वय ७५, रा.गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) यांचा खून झाला असून त्यांची पत्नी इंदुबाई गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दि. ६ रोजी आरोपी चोरमन्याने जबरदस्तीने गुप्ता यांच्या घरात घुसून दारुच्या नशेत नरेशदास यांना मारहाण केली होती. मारहाण करून तो फरार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल केले असता बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव, अविनाश संकपाळ यांनी या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी चोरमन्या याला थेऊर फाट्याजवळ नायगाव येथे ताब्यात घेतले. त्याच्या कडून चोरीची एक दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत.