नाशिकमध्ये मिठाईविक्रेत्याकडे खंडणीची मागणी करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 04:31 PM2018-01-10T16:31:36+5:302018-01-10T16:35:45+5:30

नाशिक : चीप्स खरेदीचे पैसे मागणाºया वसंत मार्केटमधील मिठाई विक्रेत्यास धमकावून त्याच्याकडून हजार रुपयांच्या खंडणीची मागून दोनशे रुपयांची वसूली केल्यानंतर या खंडणीखोरांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी(दि़९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वसंत मार्केटमध्ये घडली़

 In Nashik, the demand for ransom was taken by the sweet seller | नाशिकमध्ये मिठाईविक्रेत्याकडे खंडणीची मागणी करून मारहाण

नाशिकमध्ये मिठाईविक्रेत्याकडे खंडणीची मागणी करून मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे मिठाई विक्रेत्यास धमकावून हजार रुपयांची खंडणीसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : चीप्स खरेदीचे पैसे मागणा-या वसंत मार्केटमधील मिठाई विक्रेत्यास धमकावून त्याच्याकडून हजार रुपयांच्या खंडणीची मागून दोनशे रुपयांची वसूली केल्यानंतर या खंडणीखोरांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी(दि़९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वसंत मार्केटमध्ये घडली़

अनिल आत्माराम जाधव (रा. आॅस्कर प्राईड अपार्टमेंट, पेठेनगर, इंदिरानगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फियार्दीनुसार, त्यांचे कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केटजवळ इंदोर स्वीटस अ‍ॅण्ड नमकीनचे दुकान आहे. रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास संशयित सुनील शिवाजी खैरनार व त्याचा साथीदार दुकानात आले व चीप्सचे पाकीट घेतले. यावेळी दुकानातील कामगाराने चीप्सचे पैसे काऊंटरवर देण्यास सांगितले असता, संशयित खैरनार याने, मी सुनील खैरनार असून या परिसरातील भाई आहे. माझ्याकडून पैसे घेतो काय, असे म्हणून जाधव व त्यांच्या दुकानातील कर्मचाºयांना हातपाय तोडण्याची व दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली.

यानंतर संशयित खैरनार व त्याच्या साथीदाराने दुकानदार जाधव यांच्याकडे एक हजार रुपयांची खंडणी मागून दोनशे रुपयांची खंडणी वसूल केले़ मात्र एक हजार रुपये न दिल्याच्या रागातून संशयितांनी दुकानमालक जाधव यांच्या डोक्यात प्लास्टिकचा स्टूल मारून त्यांना जखमी केले़ या प्रकरणी संशयित सुनील शिवाजी खैरनार व त्याचा साथीदाराविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  In Nashik, the demand for ransom was taken by the sweet seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.