पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:04 IST2019-05-10T16:03:53+5:302019-05-10T16:04:44+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने ल्याले जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एका वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
शिरुर (कान्हूरमेसाई) : शिरुर तालुक्यातील शात्ताबाद येथे घरासमोरील ओसरीत बसल्या होत्या. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पाय, हात तसेच पोटाला चावल्याले जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एका वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अजनाबाई बाजीराव गोरडे (वय ८५ ) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. घरासमोरील ओसरीत बसलेल्या असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना चावा घतल्याने जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना पुढील उपचारासाठी राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावातील इतरांनाही कुत्र्याने चावा घेतल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.