Pune: ट्रॅक्टरचा धक्का लागून ऊसतोड तरुणाचा मृत्यू, रावडेवाडी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:30 IST2024-03-20T16:29:21+5:302024-03-20T16:30:34+5:30
रात्रीच्या अंधारात रस्त्याने चाललेला तरुण आजिनाथ सांगळे यास ट्रॅक्टरची धडक बसली...

Pune: ट्रॅक्टरचा धक्का लागून ऊसतोड तरुणाचा मृत्यू, रावडेवाडी परिसरातील घटना
मलठण (पुणे) : रावडेवाडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागून रस्त्याच्या बाजूने चाललेला ऊस तोड मजूर आजिनाथ जगन्नाथ सांगळे (वय ३५, रा. चक्कलंबा, ता. गेवराई, जि. बीड) यांचा मृत्यू झाला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले की, रविवार दि.१७ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास रावडेवाडी येथे पराग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर ( क्र.एम.एच. १६, बीएम ०१३९) हा उसाने भरून येत होता.
त्यावेळी रात्रीच्या अंधारात रस्त्याने चाललेला तरुण आजिनाथ सांगळे यास ट्रॅक्टरची धडक बसली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर पराग कारखान्यावर वडनेर शिवारातून ऊस घेऊन टाकळी हाजी मार्गे येत असताना रावडेवाडी हद्दीत हा अपघात झाला.