शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 16:41 IST

व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती

बारामती : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर शुक्रवारी (दि २२) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले पोलीस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे,चव्हाणवाडी ता. इंदापूर) यांचे सोमवारी (दि. २५) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. 

शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ते व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते डोक्यावर पडुन गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र,डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठीकाणी देखील त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना तेथून पुन्हा रविवारी(दि २४) रात्री बारामतीत खासगी रुग्णालयात आणण्यात आले. या ठीकाणी देखील त्यांची प्रकृती गंभीर होती. सोमवारी उपचारा दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. 

यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते. कदम यांनी बारामती शहर,जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काम केले आहे.‘डॅशिंग’ पोलीस कर्मचारी म्हणुन त्यांची ओळख होती.त्यामुळे त्यांचा अपघात कि घातपात याबाबत चर्चांना उधाण आले होते.सायंकाळी  उशीरा चव्हाणवाडी (ता.इंदापुर) या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परीसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान,या अपघाताबाबत पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा अपघात झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे.पोलीसांनी याबाबत तपास सुरु केला असुन संबंधित वाहनचालकाचा तपास सुरु असल्याचे तायडे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू