शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

By admin | Updated: January 14, 2015 23:57 IST

पाकीटमार व भुरट्या चोराचा, तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना

राजगुरुनगर : पाकीटमार व भुरट्या चोराचा, तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि. १२ जानेवारी रोजी रात्री घडली. या तरुणांपैकी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली. गणेश मल्हारी वाघमारे (वय २३, रा- चांडोली, ता. खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या चोराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता राजगुरुनगर बस स्थानकाच्या आवारात ही घटना घडली. राखी ज्ञानेश्वर हांडे (रा. मंचर) या महिलेची पर्स चोरी केल्याच्या कारणावरून वाघमारे यास या महिलेचे नातेवाईक विजय पाराजी हांडे आणि त्याच्या जोडीदारांनी लाथा-बुक्क्या आणि काठीने बेदम मारहाण केली. त्यास ठार मारून त्याचे प्रेत चांडोली येथे कडूस रस्त्यालगत आणून टाकले, अशी फिर्याद मृताच्या वडिलांनी दिली. त्याचा मृतदेह १३ जानेवारी रोजी सकाळी लोकांना आढळून आल्यावर त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी विजय हांडे, धनंजय पवळे, अमित राक्षे, विजय रोकडे, संकेत होले, मुकुंद राक्षे, तेजस कचाटे, बंटी राक्षे या आठजणांसह इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)