खून झालेल्या युवकांची आकस्मिक मयत म्हणून नोंद, तत्कालीन पोलिसांचे प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:45 IST2018-12-26T00:45:09+5:302018-12-26T00:45:27+5:30
अडीच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू नोंद झालेल्या त्या दोन युवकांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून त्यांचा खूनच झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

खून झालेल्या युवकांची आकस्मिक मयत म्हणून नोंद, तत्कालीन पोलिसांचे प्रताप
चाकण : अडीच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू नोंद झालेल्या त्या दोन युवकांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून त्यांचा खूनच झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. याबाबत तत्कालीन पोलिसांनी कामात निष्काळजीपणा करून दोन्ही खुनाचे आकस्मिक मृत्यू झाल्याचे नोंद केल्याने पोलीस वतुर्ळात खळबळ उडाली आहे, त्यामुळे अजूनही काही प्रकरणे उजेडात येतील, असे पवार यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संतोषनगर गावच्या हद्दीत भामा नदीच्या पात्रात १५ ते १८ मार्च २०१६ दरम्यान शैलेश धोंडू शिंदे ( वय ३०, रा. सुखशांती हाऊसिंग सोसायटी, स्पाईन रोड, चिखली, पुणे ) यांचा मृतदेह मिळाला होता. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना शैलेश यांना जबर मारहाण करून मृतदेह नदी पात्रात फेकून दिल्याचे निदर्शनास आले होते. १९ मे २०१६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खालूंब्रे गावच्या हद्दीत एमआयडिसीतील पानसे आॅटो कंपनीच्या पाठीमागे जाणाऱ्या अंतर्गत डांबरी रोडपासून ६० अंतरावर असलेल्या रोडच्या कडेला असणा?्या चारीमध्ये अंदाजे २० ते २५ वयाच्या अनोळखी तरुणाचा जळालेला मृतदेह मिळाला होता. त्यावेळी चाकण पोलिसांनी मयत रजिस्टरला आकस्मिक मयत अशी नोंद केली होती. चाकण पोलीस ठाण्यात आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.