death of it engineer due to dengue | धनकवडीमध्ये डेंगीनेे घेतला आय टी अभियंता तरूणीचा बळी
धनकवडीमध्ये डेंगीनेे घेतला आय टी अभियंता तरूणीचा बळी

धनकवडी : डेंगीवर उपचार घेणाऱ्या धनकवडीतील तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनीवारी रात्री घडली. श्रावणी श्रीधर वरूटे ( वय वर्षे २४) असे मृत तरूणीचे नाव असून ती हिंजवडी आयटी पार्क मध्ये आय टी इंजिनीअर म्हणून काम करीत होती.
                
ताप येऊन अंगदुखीचा त्रास होवू लागला म्हणून गुरूवारी सकाळी श्रावणीने फँमिली डॉक्टरकडे उपचार घेतले होते. मात्र शनीवारी तिची तब्बेत पुन्हा बिघडली म्हणून फॅमीली डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना सुयोग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी श्रावणी यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्त तपासणी केली असता प्लेटलेटस् पंचेचाळीस हजारापर्यंत घसरल्या होत्या. शनीवारी रात्री तिचा रक्तदाब कमी झाला म्हणून भारती हॉस्पिटलला नेण्यात आले. तपासणी सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.


Web Title: death of it engineer due to dengue
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.