इंदापूर येथील महापारेषणच्या जखमी कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:59 IST2018-05-15T20:59:48+5:302018-05-15T20:59:48+5:30
उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम करत असताना अपघात होवून कर्मचारी गंभीररीत्या भाजले होते.

इंदापूर येथील महापारेषणच्या जखमी कर्मचाऱ्याचा मृत्यू
इंदापूर : इंदापूर येथील १३२ केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रात दुरुस्तीचे काम करताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सुनिलदत्त संभाजी हजारे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी (दि. १४) सायंकाळी उपचार सुरु असताना पुण्यातील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. हजारे हे महापारेषण बारामती विभागाच्या अंतर्गत येथील १३२ केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रात तंत्रज्ञ-दोन या पदावर कार्यरत होते. मंगळवारी (दि. ८) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ते उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम करत असताना अपघात होवून गंभीररीत्या भाजले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यात ‘सुर्या हॉस्पिटल’ येथे दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्यांचे आज निधन झाले.