शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोकाट जनावरांच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 7:07 PM

माेकाट वळूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह इंदापूर नगरपालिकेसमोर ठेवला.

इंदापूर : मोकाट वळूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले अशोक शंकर साळुंखे (वय ६२, रा. वडार गल्ली, ता. इंदापूर) यांची तीन महिन्यांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अशस्वी ठरली. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह नगरपालिकेसमोर ठेवला. याप्रकरणी दोषी असलेल्या पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर अखेर साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.      अशोक साळुंखे इंदापूर येथे पुणे-सोलापूर महामार्गाने जात होते. यावेळी मोकाट वळूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे ते कोमामध्ये गेले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर घरीच उपचार चालू ठेवण्यास सांगितले होते. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यांचा रविवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. याची माहिती त्यांचे नातेवाईक किरण सुखदेव साळुंखे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या मृत्यूनंतर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संतप्त  नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेसमोर बाजारात त्यांचा मृतदेह ठेवत अंत्यसंस्कार ठेवण्यास नकार दिला. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास वारंवार सांगूनही नगरपालिकेने कुठल्याच उपाययोजना न केल्याने नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

     नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर दुपारी ३.१० वाजता नगरपालिकेसमोर साळुंखे यांच्या नातेवाईकांची नगरसेवक भरत शहा, काँग्रेस गटनेते कैलास कदम, राष्ट्रवादी गटनेते गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, अमर गाडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, पांडूतात्या शिंदे, रमेश धोत्रे, अ‍ॅड. राहुल मखरे यांनी भेट दिली. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच जनरल बॉडीची मीटिंग घेऊन भरपाई देणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

बाजारात तणावपूर्ण वातावरण मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेच्या निषेधार्थ व नुकसानभरपाई देण्याबाबत लेखी आश्वासन मिळावे, यासाठी नगरपालिकेसमोर मृतदेह ठेवून एकच गर्दी केली होती. त्यामुळे बाजारात नेमके काय झाले आहे? हे बाजारासाठी आलेल्या नागरिकांना कळत नव्हते. मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने बाजारामध्ये बंदोबस्त लावल्याने तणाव निवळला. या घटनेमुळे काही काळ बाजारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.   

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरDeathमृत्यू