Death by drowing in farmlake during playing; Unfortunate incident in Indapur taluka | बहीण भावंडांचा खेळताना शेततळ्यात बुडुन मृत्यू; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

बहीण भावंडांचा खेळताना शेततळ्यात बुडुन मृत्यू; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

इंदापूर (शेटफळगढे) : निरगुडे  (ता. इंदापूर) येथे शेतमजुराची मुलगा व मुलगी खेळत खेळत शेततळ्याकडे गेले होते.खेळण्याच्या नादात ते दोघेही पाण्यात पडले. त्यातच बहीण भावंडाचा दुर्दैवी अंत झाला.

भिगवण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडे येथील शेतमजुराची मुलगा व मुलगी खेळत खेळत शेततळ्यात गेले
होते.ते दोघे पाण्यात पडुन मुत्युमुखी पडले आहे.याबाबत मुलांच्या आई रेणुका मिसाळ यांनी भिगवण पोलिसात फिर्याद दिली आहे.
        बुुधवारी (दि.५ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निरगुडे येथील केकाण वस्तीजवळ मिसाळ कुटुंबिय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दिपाली चंद्रभान मिसाळ (वय १२) व मुलगा कृष्णा चंद्रभान मिसाळ (वय ८) हे खेळत खेळत घरासमोरील तळ्याजवळ गेले होते. त्यांचा  पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. शेजारच्या शेतकऱ्याने याबाबत मिसाळ दांपत्याला माहिती दिली. त्यानंतर या भावंडांच्या आईने जावून पाहिले असता दिपाली व कृष्णा पाण्यात पडलेले दिसले. त्यांना तेथील जमलेल्या लोकांनी पाण्यातुन बाहेर काढले. त्यानंतर भिगवण आयसीयु हॉस्पीटल येथे दोघांंना आणले.मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हवालदार संदिप कारंडे करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Death by drowing in farmlake during playing; Unfortunate incident in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.