वाघोलीत ११ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:36 IST2018-04-20T19:36:02+5:302018-04-20T19:36:02+5:30
वाघोली येथे लोहगाव रोडवर असलेल्या बांधकाम साईटवर काम करत असताना अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला.

वाघोलीत ११ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू
वाघोली : वाघोली येथे लोहगाव रोडवर असलेल्या बांधकाम साईटवर काम करत असताना अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान घडली. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रोहन अभिलाषा बांधकाम व्यावसायिकाकडे तेज बहादूर सिंग (वय ३२ वर्षे,रा-इलाहाबाद) कामाला होता. सिंग सध्या ईवन इमारतीच्या साईटवर काम करत होता. मात्र, इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन तो खाली कोसळला. यावेळी कामगाराने कोणतीही सुरक्षेचा काळजी घेतली नव्हती. त्यामुळे या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.