भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 20:40 IST2019-06-05T20:37:56+5:302019-06-05T20:40:06+5:30

पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला.

death of brothers due to drowning in a river at Chikhalavade near Bhor | भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

ठळक मुद्दे१० ते १५ दिवसापुर्वी नाटंबी येथील एका मुलाचा कालव्याच्या पाण्यात बुडुन मुत्यू

भोर :  निरा नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन  मुत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी  ३.३० वाजता चिखलावडे  गावाजवळ  घडली. अनिकेत शंकर कोंढाळकर (वय १५ रा चिखलावडे ता.भोर), मिलिंद जाधव (वय १७, रा. नारायणपुर, ता. पुरंदर) असे मृत मुलांची नावे असून ते सख्ये मावस भाऊ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी २ वाजता अनिकेत आणि त्याच्या मामाकडे  सुट्टीनिमित्त आलेला मिलिंद  हे  चिखलावडे गावाजवळच्या निरानदीत पोहायला गेले होते.  पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला. त्यांना वाचवीण्यासाटी स्थानिकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी पोलीसांन मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.  
  १०  ते १५ दिवसापुर्वी नाटंबी येथील एका मुलाचा कालव्याच्या पाण्यात बुडुन मुत्यू झाला होता. या घटनेला   १० दिवस होत नाहीत तोच शेजारी असलेल्या चिखलावडे गावातील दोन सख्या मावस भावांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला आहे. 
 

Web Title: death of brothers due to drowning in a river at Chikhalavade near Bhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.