शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 13:19 IST

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय 65) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला आहे.  

प्रकाशन व्यवसायात अरुण जाखडे यांचे बहुमूल्य योगदान आहे. नगरच्या आष्टीसारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेले. या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. निसर्गासह माणसे, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना 'इर्जिक' या स्तंभलेखनासाठी झाला. विशेष प्रकल्पाचे नियोजन करून काम करणे हे पद्मगंधा प्रकाशनाचे वैशिष्ट्य . या कार्यपद्धतीमुळे त्यांनी पद्मगंधा प्रकाशनाच्या माध्यमातून वाङ्मयीन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.  बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर पुस्तके प्रकाशित

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डाॅ. रा. चिं.ढेरे लिखित श्री तुळजाभवानी हा ग्रंथ तसेच रघुनाथ धोंडो कर्वे या विसाव्या शतकातील विचारावंतांचे विचारधन आठ खंडात कोणत्याही अनुवादाशिवाय त्यांनी प्रकाशित केले. हा प्रकल्प पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली होती. याशिवाय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा,भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण,विश्वरूपी रबर,शोधवेडाच्या कथा आदी विपुल साहित्य त्यांनी प्रकशित केले. लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. याशिवाय बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स दिल्ली संस्थेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे सहा पुरस्कार तसेच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती साठी दिला जाणारा ' श्री. पु भागवत पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

टॅग्स :Deathमृत्यूartकलाcultureसांस्कृतिकSocialसामाजिक