शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

निगडीत इलास्टिक दोरीचा गळफास लागून ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 8:36 PM

घरात खेळता खेळता इलास्टिक दोरीचा गळफास लागुन आठ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाही दिवसांनी मुंज असल्यामुळे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर

पिंपरी : घरात खेळता खेळता इलास्टिक दोरीचा मुलाला गळफास लागुन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. नकुल कुलकर्णी (वय-८) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अवघ्या काही दिवसांवर त्याच्या मुंजीचा कार्यक्रम सोहळा होणार होता.या घटनेचा तपास  देहूरोड पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घरात खेळता खेळता नकुल या आठ वर्षाच्या मुलाला गळफास लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आजी आजोबा बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते तर नकुलची काही दिवसांनी मुंज असल्यामुळे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर गेले होते. नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलेस्टिक दोरीसोबत खेळताना त्याला गळफास लागला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबियांनी त्याला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने अखेर दाराचे कुलूप तोडले तेव्हा गळफास लागलेल्या अवस्थेत नकुल आढळून आला. 

टॅग्स :nigdiनिगडीDeathमृत्यूPoliceपोलिस